सेक्ससाठी काय पण; सुन्न करणारा क्राईम थ्रिलर चित्रपट “लेडी मॅकबेथ”

सेक्ससाठी काय पण; सुन्न करणारा क्राईम थ्रिलर चित्रपट “लेडी मॅकबेथ”

तुम्हाला मॅकबेथ माहित असेल. सत्तेच्या हव्यासा पोटी कशाप्रकारे मॅकबेथ सर्वस्व गमावून बसतो. आपल्याच राजाचा खून केल्यानंतर मॅकबेथच्या मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना होती. पण त्याची बायको मात्र निश्चयावर ठाम होती. काही चित्रपटात आपण पाहतो की ज्यावेळी स्त्रीया व्हिलनिश भूमिका साकारतात तेव्हा त्या पुरुषांपेक्षाही कठोर आणि निर्दयी वाटतात. अनेक चित्रपटात भूतांचा वापर केला जातो तेव्हा पुरुष भूतापेक्षाही स्त्री भूत जास्त भयावह वाटतं. ९० च्या दशकात झालेले लहान मुलांचे अपहरण आणि खून आठवतायत का तुम्हाला? त्यावेळी मीही लहान होतो. सीमा गावीत आणि रेणुका शिंदे या दोन बहिणींनी मिळून हैदोस घातला होता. यामध्ये त्यांची आई अंजना सुद्धा सामील होती. आता तर या विषयावर वेब सीरीज सुद्धा निघालीय. स्त्रीचं हे एक वेगळं रुप आहे. ते रुप बर्‍याचदा पडद्यावर रंगवण्यात आलंय. कर्ज़ चित्रपटातली सीमी गरेवाल, ऐतराज़मधली प्रियंका चोप्रा, गुप्तमधली काजोल अशा काही गाजलेल्या लेडी व्हिलन बॉलिवूडमध्ये आहेत.

आज मी २०१६ रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रिटिश चित्रपटाबद्दल सांगणार आहे. चित्रपटाचं नाव आहे “लेडी मॅकबेथ”… विलियम ऑलड्रॉयने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून अलाइस बर्चने स्क्रीनप्ले लिहिला आहे. निकोलाय लेस्कॉने लिहिलेल्या लेडी मॅकबेथ या कादंबरीवर चित्रपट बेतलेला आहे. फ्लोरेंस प्यू कॅथरिनच्या प्रमुख भूमिकेत आहे आणि कॉस्मो जॅर्विस या नवोदित अभिनेत्याने तिच्या प्रियकराची भूमिका साकारली आहे. फ्लोरेंस प्यूला या भूमिकेसाठी उत्कृष्ठ अभिनेत्रीसाठी ब्रिटिश इंडिपेंडेंट फिल्म अवार्ड मिळाला आहे. ही अभिनेत्री सध्या नेटफ्लिक्सवर गाजतेय. पण या चित्रपटामुळे तिला खरी ओळख प्राप्त झाली आहे.

लेडी मॅकबेथ एक पिरियड ड्रामा आहे. १८६५ ची ही कथा… कॅथरिन या सुंदर मुलीचं लग्न तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या माणसाशी, ऍलेक्झेंडरशी होतं. इंग्लंडच्या ग्रामीण भागात ऍलेक्झेंडरच्या वडिलांच़्या, बोरिसच्या इस्टेटमध्ये ते राहतात. लग्न झाल्यानंतर कॅथरिनवर अनेक बंधने येतात. तिला वेळापत्रकाचं पालन करायला सांगितलं जातं, एवढंच काय तर बाहेर जाण्यावरही तिच्यावर प्रतिबंध असतं. बोरिस हा खडूस सासरा आहे. त्यांना मूल होत नाही म्हणून तो कॅथरिनला दोष देतो. पण त्याचा मुलगा ऍलेक्झेंडरला सेक्समध्ये फारसा इंटरेस्ट नसतो. त्याला केवळ तिचं निर्वस्त्र शरीर पाहायला आवडतं. कॅथरिन अशा वातावरणात राहुन खूप वैतागलीय. तिला मोकळा श्वास घ्यायचाय. त्यात तिचा नवरा हा चांगला सेक्स पार्टनरही नाही. एवढी मोठी इस्टेट आहे. पण सुख कसलंच नाही.

एक दिवस ऍलेक्झेंडर आणि बोरिस एका कामासाठी काही दिवसांसाठी बाहेर जातात. दोघंचंही वेगळं काम आहे आणि दोघेही वेगळ्या मार्गाने गेलेत. ते गेल्यावर ती मोकळा श्वास घेते. इतकी दिवस ती बाहेर सुद्धा गेली नव्हती म्हणून ती मोकळ्या वातावरणात फिरते. घरात आता फक्त त्यांची मोलकरीण ऍना आणि कॅथरिन आहेत. ऍना कॅथरिनला नियमांबद्दल सारखी सारखी जाणीव करुन देते. पण कॅथरिनला आता मोकळं रान मिळालंय.

अचानक कॅथरिनची ओळख त्यांच्यात शेतात काम करणार्‍या एका तरुणाशी सेबॅस्टियनशी होते. सेबॅस्टियन हा रांगडा गडी आहे, दिसायलाही सुंदर आहे. मग दोघांमध्ये सेक्स होतो… याबद्दल ऍनाला सुद्धा कळतं… आणि त्यानंतर सुरु होतो लेडी मॅकबेथचा खूनी खेळ…

सुरुवातीला कॅथरिन ही शांत मुलगी वाटते आणि सेबॅस्टियन हा रांगडा व बिनधास्त गडी वाटतो. पण जसजसा चित्रपट पुढे सरकत जातो, तेव्हा कॅथरिनचं खरं रुप दिसत जातं. कॅथरिन ही गुन्हेगार आहे का? तर नाही. पण अगदी तरुण वयात तिचं लग्न झालं आणि तिला इतक्या मोठ्या इस्टेटीत कोंडून ठेवलं गेलं, त्यात तिला नवर्‍याकडून शरीरसुखही नाही मिळालं म्हणून तिच्यातला बंडखोरपणा जास्त उफाळून येतो. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ती कुणी अबला स्त्री वाटत नाही. तिच्या डोळ्यांत बंडखोरपणा आहेच. पण नवरा आणि सासरा या पुरुषांसमोर तिला काही करता येत नाही. आणि जेव्हा तिची ओळख सेबॅस्टियनशी होते तेव्हा तिच्या बंडखोरीला एक कारण मिळतं. सेबॅस्टियनपेक्षा जास्त शरीराची भूक तिला लागते. एका सीनमध्ये तर दोघं सेक्स करतायत आणि तिला नवर्‍याच्या घोड्याचा आवाज येतो. तेव्हा सेबॅस्टियन लपतो. पण नवर्‍याला त्यांच्याबद्दल कळलेलं आहे. तेव्हा कॅथरिन सेबॅस्टियनला बोलवते आणि ते दोघं नवर्‍यासमोर सेक्स करु लागतात. कॅथरिनची ही हिंमत पाहून नवर्‍याला अश्चर्य वाटतं.

Watch Lady Macbeth movie trailer:

चित्रपटात बरेच सेक्स सीन्स आहेत. चित्रपटाची थीम बोल्ड ठेवण्यात आली आहे. आणि सगळे सेक्श्युअल दृश्य पॅशनेट आहेत. यावरुन कॅथरिनची सेक्सबद्दलची हाव पेक्षकांच्या लक्षात येते. कॅथरिनला आपण कदाचित व्हीलन ठरवून मोकळे होऊ. अर्थात खून करणे हा गुन्हाच असतो. पण तिच्या दृष्टीकोनातून जर आपण चित्रपट पाहिला तर आपल्याला एक वेगळाच पुरुष प्रधान ऍंगल दिसून येतो आणि कॅथरिन या पुरुष प्रधान संस्कृतीवर हावी होताना दिसून येते.

हेही वाचा:

कॅथरिनचा बिनधास्तपणा चित्रपटात पाहिण्यासारखा आहे. ती आपल्या सासर्‍याला विष पाजून मारुन टाकते. प्रियकारावर हात उचलणार्‍या नवर्‍याचा खून करते, इतकंच काय तर एका लहान मुलाचाही खून करते. हे इतके खून ती पचवते. पण ते खून पचवणे सेबॅस्टियनला जरा जड जातं. मॅकबेथ चित्रपटात खून केल्यानंतर मॅकबेथला भूतं दिसायला लागतात, त्याचं मन खाऊ लागतं… पण लेडी मॅकबेथच्या चेहर्‍यारची रेषही हलत नाही. तिच्या चेहर्‍यावर कोणत्याही प्रकारचा पश्चाताप नाही, तिला दुःख किंवा भितीही वाटत नाही

आणि कॅथरिनची भूमिका करणार्‍या फ्लोरेंस प्यूने ही भूमिका जगली आहे. ती खूप सुंदर आहे, सेक्सी आहे पण तितकीच किल्लरही आहे. सौंदर्य हे समोरच्यासाठी किती घातक ठरु शकतं हे तिनं छान प्रकारे दाखवलंय. ती अगदीच तरुण म्हणजे २३ वर्षांची अभिनेत्री आहे. पण तिच्या अभिनयात एक प्रकारची मच्युअरिटी आहे. दिग्दर्शक जुनं इग्लंड दाखवण्यात यशस्वी झालाय. चित्रपट पाहताना आपल्या कळते की ही १८ च्या दशकातली कथा आहे. गाड्या किंवा इमारतीच नव्हे तर अगदी जंगलाची शूट असेल त्यातही काळ समजतो हे विशेष… माझ्या मते ही एक चांगली शोकांतिका आहे…

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *