“मी पण मोबाइल”… १ ली ते ५ वी पर्यंत स्पर्धेत लहान मुलाला करण्यासारखी स्क्रिप्ट!

“मी पण मोबाइल”… १ ली ते ५ वी पर्यंत स्पर्धेत लहान मुलाला करण्यासारखी स्क्रिप्ट!

“मी पण मोबाइल”… १ ली ते ५ वी पर्यंत स्पर्धेत लहान मुलाला करण्यासारखी स्क्रिप्ट!

(एक लहान मुलगा रंगमंचावर येतो…. त्याने मोबाईलसारखा ड्रेस घातलाय)

अरे मीच तो…. अरे मीच तो…. अरे मीच तो…. (थोडासा विचार करत) अरे पण मी आहे तरी कोण? हा, आठवलं. मी आहे मोबाईल. असे काय पाहताय? Don’t you believe me? तुम्ही म्हणत असाल हा तर एक छोटुसा गोड गोड मुलगा आहे, माणसाचा… मग हा मोबाईल कसा असू शकतो. पण मला मोबाईल व्हावं लागलं. कारण आजकाल लहान मुलांना कुणी love करत नाही. love करतात ते मोबाईलला. मम्मी, पप्पांना पण मोबाईल आवडतो. ते माझ्याकडे नाही तर मोबाईलकडेच जास्त लक्ष देतात. मी स्टडीचं काही विचारलं तर पप्पा म्हणतात, “Search in ur mobile बेटा” हुश्श्श!

मी असं ऐकलंय, पूर्वीचे आजी-आजोबा लहान मुलांना गोष्ट सांगायचे. पण आजचे आजी-आजोबा मुलांना मोबाईलवर गोष्टी ऐकवतात आणि स्वतः फेसबुकवरुन Lecture देत बसतात. आजची पिढी ना बाई अशी, आमच्या वेळी नव्हतं हो असं (आजीची ऍक्टिंग करत, चिडवत म्हणतो). ती शेजारची दिदी पण सतत मोबाईलवर रील्स बनवत असते. (मुली रील्स बनवतात तशी ऍक्शन करतो, पाऊट करतो)… donkey… आमचे टिचर शिकवतात कमी, आणि वॉट्सअप जास्त पाठवतात. रोड क्रॉस करताना मोबाईल, फॅमिली टाइम स्पेंड करताना मोबाईल, खेळताना मोबाईल, झोपताना मोबाईल.. मोबाईल मोबाईल मोबाईल… म्हणून मी ठरवलं आजपासून मी पण मोबाइल..

हे देखील वाचा:
शाळकरी मुलांसाठी लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त म्हणावयाचे भाषण – टिळकांची उत्सवांतून जनजागृती

आता मी मोबाईल झालोय, मग सगळे मला खूप लव्ह करतील, खूप लाड करतील. मी टिचरचा पण फेवरेट होईन. Yes or no? so my dear friends, तुम्ही पण मोबाईल व्हा. नाहीतर तुम्हाला कुणीच लव्ह करणार नाही. Lets unite… (मग सगळी मुलं स्टेजवर येतात… आणि “मी पण मोबाईल” असं ५-६ वेळा एकत्र म्हणतात..)

(तेवढ्यात एक बाई स्टेजवर येते आणि म्हणते)

बाई: पाहिलंत? या लहान मुलांना जितकं कळतं तितकं आपल्याला का कळत नाही. मोबाईलच्या अतिरेक वापरामुळे आपण आपल्या माणसांपासून किती दूर गेलो आहोत. एकाच घरातली माणसं बाजूबाजूला बसून एकमेकांशी चॅट करतात? हे कधी थांबणार आहे? हे थांबलं पाहिजे. हे जर नाही थांबलं, तर आपल्या या लहान मुलांवर परिणाम होईल.

(तेवढ्यात तो लहान मुलगा त्या बाई जवळ येतो आणि तिला उचलून घ्यायला सांगतो आणि म्हणतो)

मुलगा: हे थांबलंच पाहिजे, हे थंबलंच पाहिजे. हमारी मांगे पूरी करो…

(मग सगळी मुलं एकत्र म्हणतात हे थांबलंच पाहिजे, हे थांबलंच पाहिजे…)

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *