एका गोंडस लहान मुलाचा थरार – सत्तरच्या दशकात गाजलेला हॉरर चित्रपट “दि ओमन”

एका गोंडस लहान मुलाचा थरार – सत्तरच्या दशकात गाजलेला हॉरर चित्रपट “दि ओमन”

एकदा झूमध्ये गेले असता तेथील प्राणी डॅमियनला पाहून घाबरतात, माकडं तर बिथरतात. कॅथरिनला कळत नाही की नेमकं काय झालं. डॅमियनमध्ये असं काहीतरी आहे याची चुणूक तिला लागते. पण पाच वर्षांचं ते निरागस गोड पोर… कॅथलिक प्रिस्ट फादर ब्रेनान रॉबर्टला डॅमियनच्या रहस्यमय अस्तित्वाबद्दल सावध करतो आणि सांगतो की डॅमियन हा मनुष्य प्राणी नाही.
दि बाबाडूक; भिती कशाला म्हणतात हे दर्शवणारा ऑस्ट्रेलियन वास्तविक हॉरर सिनेमा

दि बाबाडूक; भिती कशाला म्हणतात हे दर्शवणारा ऑस्ट्रेलियन वास्तविक हॉरर सिनेमा

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकांना घाबरवण्यासाठी विद्रूप चेहरे किंवा दचकवणार्‍या बॅंगचा उपयोग केलेला नाही. सुरुवातीपासून काही विशिष्ट सीन्सद्वारे भिती निर्माण करण्यात आली आहे. खेळताना सॅमचं लोखंडाच्या दांडीवर सरळ उभं राहणं, अमेलियाला आलेल्या बाबाडूकच्या फोन कॉलची तक्रार करायला जेव्हा ती पोलिस स्टेशनमध्ये जाते तेव्हा पोलिसाच्या मागे तिला बाबाडूकचे कपडे दिसतात किंवा टिव्हीमध्ये दिसणारे भयचित्रे आणि कार चालताना एका ठिकाणी पाहून सॅम बाबाडूकला जायला सांगतो, अशा प्रसंगांनी भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बाबाडूक अमेलियावर जेव्हा हावी होतो तेव्हा ती त्यांच्या पाळीव कुत्र्याची मान मुरगळते, हा प्रसंग जास्त भेदक आहे.