एका गोंडस लहान मुलाचा थरार – सत्तरच्या दशकात गाजलेला हॉरर चित्रपट “दि ओमन”

एका गोंडस लहान मुलाचा थरार – सत्तरच्या दशकात गाजलेला हॉरर चित्रपट “दि ओमन”

एकदा झूमध्ये गेले असता तेथील प्राणी डॅमियनला पाहून घाबरतात, माकडं तर बिथरतात. कॅथरिनला कळत नाही की नेमकं काय झालं. डॅमियनमध्ये असं काहीतरी आहे याची चुणूक तिला लागते. पण पाच वर्षांचं ते निरागस गोड पोर… कॅथलिक प्रिस्ट फादर ब्रेनान रॉबर्टला डॅमियनच्या रहस्यमय अस्तित्वाबद्दल सावध करतो आणि सांगतो की डॅमियन हा मनुष्य प्राणी नाही.